Monday, May 23, 2022

महाराष्ट्रात पुन्हा लागू होऊ शकतो हा नियम, काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील अनेक भागांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा मास्क लावण्याचा नियम लागू केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की “राज्यात सध्या मास्क अनिवार्य करण्याची गरज नाही. मात्र कोविड-19 च्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्यास मास्क घालण्याचा नियम सक्तीचा केला जाऊ शकतो”.

औरंगाबाद येथे टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 155 नव्या रुग्णांची नोद झाली आहे.राजेश टोपे म्हणाले

देशातील काही भागात संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत आणि ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

सध्या राज्यात निर्बंधांची गरज नाही. परंतु प्रकरणे वाढल्यास आम्हाला निर्बंध लादावे लागतील आणि मास्क घालणे अनिवार्य करावे लागेल.टोपे म्हणाले की “राज्य सरकारने परिस्थितीवर

बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला 12-14 आणि 15-17 वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांच्या कोविड-19 लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आता

शाळा बंद असल्याने यात काही आव्हाने आहेत. 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी केंद्र सरकारने कोणताही प्रोटोकॉल जारी केला असेल तर आम्ही त्याची जलद गतीने अंमलबजावणी करू.

तसेच “कोविड-19 लसीकरण अनिवार्य नसले तरी लोकांना लसीकरणाचे फायदे दाखवून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे लागेल असेही राजेश टोपे म्हणाले.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!