नेवासा
नेवासा।तालुक्यातील तरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.स्वप्नाली राधकीसन क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जालिंदर तुपे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सरपंच पदासाठी सौ.स्वप्नाली
राधकीसन क्षीरसागर यांचा एकच अर्ज आला. जालिंदर तुपे यांनी सूचक म्हणून सही केली होती. ११ सदस्या पैकी १० सदस्य यावेळी उपस्थित होते. एकमेव अर्ज आल्याने सौ. स्वप्नाली क्षीरसागर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कुकाणा मंडल अधिकारी श्री. फुलमाळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.त्यांना ग्रामविकास अधिकारी श्री. शेळके व तलाठी श्री.वीरकर यांनी सहकार्य केले.