Wednesday, May 25, 2022

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला ?; दिवसभरात 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती.

मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. रविवारी (१ मे) राज्यात कोरोनाचे १६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तर, यादरम्यान, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे.आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात आतापर्यंत ७७,२९, ०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे.

राज्यात आजपर्यंत ८,०२,१२, ३१० रुग्णांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.सध्या राज्यात कोरोनाचे ९९५ सक्रिय रुग्ण आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती आहे.

मुंबईत ६२८ सक्रिय रुग्ण आहे. त्यापाठोपाठ पुण्यात २०९ तर ठाण्यात ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारनं निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं राज्याची चिंता वाढली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी कोरोना

रुग्णसंख्या वाढत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेऊ असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!