माय महाराष्ट्र न्यूज:मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यावेळी सभेच्या बाजूला असलेल्या मशिदीमध्ये अजान होणार होती. याची माहिती कळताच
राज ठाकरे संतापले. जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात
काय घडेल, हे मला माहिती नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.माझी पोलिसांना विनंती आहे, जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच
बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे,
जर ती ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, अजिबात शांत बसू नका, संभाजीनगर पोलिसांना हात जोडून विनंती आहे, जर हे असे वागत असतील महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ते दाखवूनच देऊ’ असा इशाराच राज ठाकरेंनी दिली.
खरंतर सभा होणार, नाही होणार, राज ठाकरेने सभा घ्यावी, न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार, नाही मिळणार, खरंतर का ही गोष्ट केली मला अजूनही समजलेली नाही. मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात
सभा घेतली तरी तुम्ही टीव्हीवरुन पाहिलंच असतं तर. मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेतली. त्या सभेनंतर बरेचजण बडबडायला लागले. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा एक ठाण्यात घेतली.
खरंतर मी दोनच सभा घेतल्या. पण या दोन सभेवरती हे किती बोलत आहेत.ठाण्यात ज्यावेळेला सभा झाली, दिलीप धोंधरेंनी फोन केला, त्यांनी संभाजीनगरला एक सभा घेऊया सांगितलं. संभाजीनगर
हा तर महाराष्ट्राचा मध्य. मी हो सांगितलं. आता हा विषय फक्त संभाजीनगरपुरता मर्यादीत नाही. आता यापुढच्या प्रत्येक सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. तसाच विदर्भातही जाणार आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. पण या सभां आडकाठी आणून काहीच होणार नाही. कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. कोंबजा झाकायचा ठेवला तरी
सूर्य उगवायचा राहणार नाही. सूर्य उगवतोच.आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये, जी काही उरलीसुरली आहे ती संभाजीनगरमध्ये काढू असे ठाकरे म्हणाले.