Tuesday, May 24, 2022

लसीकरणाची सक्ती करता येणार नाही :सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमात सुरू आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे.

कोणत्याही व्यक्तीला लसीकरणासाठी सक्ती करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारच्या धोरणांवर

आपण काही अंशी समाधानी असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, कोणत्याही व्यक्तीला लसीकरणासाठी सक्ती करता येणार नाही. न्यायालयाने पुढे

म्हटलं की ते समाधानी आहे की सध्याचे लस धोरण अवास्तव आणि स्पष्टपणे अनियंत्रित आहे असे म्हणता येणार नाही. सरकार सार्वजनिक हितासाठी धोरण तयार करू शकते आणि काही अटी

लादू शकते, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.राज्य सरकार तसंच काही संघटनांनी लादलेल्या अटीतटींमुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यात

अडचणी येत आहेत. हे योग्य नाही, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ह्या अटीतटींचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने

लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दलची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले आहेत. जाणून घ्या देशातली लसीकरणाची आक़डेवारी देशात एक अब्ज ८९ कोटी २३ लाख ९८ हजार

३४७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तर गेल्या २४ तासांत लस घेतलेल्या नागरिकांची संख्या ४ लाख २ हजार १७० इतकी आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!