Wednesday, May 25, 2022

मोठी बातमी:केंद्राचा सर्व राज्यांना इशारा, जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात उष्म्याचा कहर सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि पेंद्रशासित

प्रदेशांना पत्र लिहून अॅलर्ट जारी केला आहे. नजीकच्या काळात उष्म्यासंबंधित आजार डोके वर काढू शकतील. त्यामुळे प्रत्येक जिल्हा स्तरावर

आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात रविवारी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात

वाढत्या उष्म्यापासून विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. उष्म्यासंबंधित आजारांवरील ‘राष्ट्रीय कृती आराखडा’ जिल्हा पातळीवर प्रसारित करा, जेणेकरून त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे

पालन करून वैद्यकीय खबरदारी घेतली जाईल, असे आरोग्य सचिव भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे. उत्तर-पश्चिम व मध्य हिंदुस्थानातील अनेक राज्ये गेल्या काही आठवडय़ांपासून

रेकॉर्डब्रेक तापमानाची काहिली सोसत आहेत. देशात एप्रिलमध्ये तब्बल 122 वर्षांतील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले आहे. त्यातच मे महिना आणखी उष्ण असण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्या पार्श्वभूमीवर पेंद्र सरकारने राज्यांना अॅलर्ट जारी केला आहे. अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 47 अंशांच्या पातळीवर पोहोचले आहे. या उकाडय़ापासून लवकर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

त्यामुळे राज्यांबरोबर पेंद्र सरकार ‘अॅलर्ट मोड’वर आले आहे.राज्यांना सूचना: हवामान खाते आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण पेंद्राद्वारे उष्म्यासंबंधी दररोज जारी केले जाणारे अॅलर्ट जिल्हा

स्तरावर पोहोचवा. उष्म्यासंबंधी राष्ट्रीय कृती आराखडय़ाच्या अंमलबजावणीवर भर द्या.आरोग्य पेंद्रांवरील सुविधांचा वेळोवेळी आढावा घ्या, आरोग्य पेंद्रांवर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवा.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!