Thursday, October 5, 2023

शिर्डी येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी , दि. १३ जून

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे‌. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी‌ दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सदर प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आली.

शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने सदर कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार व लघुलेखक (निम्नश्रेणी) अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि एकूण तीन पदांना, तर अव्वल कारकूनचे एक पद व लिपीक टंकलेखकची दोन पदे या अतिरिक्त 3 नवीन अशा एकूण ६ पदांनाही आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!