माय महाराष्ट्र न्यूज:भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने हुंडा आणि बुलेटचे दीड लाख रुपये न मिळाल्याने स्वत:च्याच पत्नीविरुद्ध संतापजनक
पाऊल उचललं. पतीने आपल्या दोन नातेवाईकांना बोलावून पत्नीवर बलात्कार करायला लावला. इतकंच नाही तर मोबाईलवरून त्याचं शुटिंग केलं. तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही
तर हे व्हिडिओ युट्यूबर टाकून पैसे वसूल करेन अशी धमकी या नराधमाने पत्नीला दिली.हे प्रकरण राजस्थानमधल्या कामण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथं एका पतीने आपल्या
पत्नीवर दोन नातेवाईकांना बलात्कार करायला लावला. या संपूर्ण घटनेचा पतीने स्वत: मोबाईलवरून व्हिडिओ बनवला. यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पती पत्नीकडून हुंडा
आणण्याची मागणी करत होता, मात्र हुंड्याची मागणी पूर्ण होऊ न शकल्याने पतीने पत्नीसोबत संतापजनक कृत्य केलं.पीडित महिलेचं २५ मे २०१९ रोजी लग्न झालं. पण लग्न झाल्यापासून सासरचे
लोक हुंड्यासाठी विवाहितेला त्रास देऊ लागले. दीड लाख रुपये आणि बुलेटची मागणी तिच्या घरच्यांकडे केली जात होती. मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक
छळ सुरू केला. तिला घरातून हकलून देण्यात आलं, त्यानंतर पीडित महिला आईच्या घरी राहत होती.साधारण 6 महिन्यांनी पतीने पत्नीच्या माहेरी जात तिला थापा मारून घरी आणलं. पण
त्याच्या मनात काही वेगळच होतं. पीडित महिलेच्या पतीने आपल्या बहिणीचा नवरा आणि एका नातेवाईकाला घरी बोलावून घेतलं. त्या दोघांनी महिलेवर बलात्कार केला, आणि पतीने त्याचा
व्हिडिओ बनवला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैसे कमवू अशी धमकी त्याने आपल्या पत्नीला दिली. त्यानंतर नराधम पतीने तिचे असे अनेक व्हिडिओ तयार केले.पीडित महिलेने
सर्व घटना आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीवरुन तीन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील व्हिडिओ
पॉर्न साईटवर टाकण्यात आले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.