माय महाराष्ट्र न्यूज:बांदा येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जिल्हा पंचायत सदस्य श्वेता सिंह गौर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
ताज्या माहितीनुसार, श्वेता सिंह यांचा पती आरोपी दीपक गौरचे संबंध आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी जोडलेले आहेत . ज्यामध्ये तो रशियन, मोरोक्कन आणि आफ्रिकन मुलींशी डील करत होता.
त्याचे काही ऑडिओ कुटुंबाच्या माध्यमातून समोर आले आहेत, ज्यामध्ये तो रशियन मुलींशी सौदेबाजी करत आहे. श्वेताच्या कुटुंबीयांनी या सर्व गोष्टी
मीडियासोबत शेअर केल्या असून हे पुरावे त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता सिंह मृत्यू प्रकरण अजूनही पोलिसांसाठी एक गूढच आहे, ज्यामध्ये
अनेक टप्प्यांवर तपास सुरू आहे. पोलिसांची अनेक पथके तपासात गुंतली आहेत. या प्रकरणी दीपकला अटक करण्यात आली असली तरी निवृत्त डीआयजी सासऱ्यासह अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.
मात्र यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्या श्वेता सिंह गौर या पती दीपकच्या वाईट सवयी आणि शोषणामुळे एवढ्या नाराज झाल्या
होत्या की अनेक दिवसांपासून त्यांना आपल्या हत्येची भीती होती. यामुळे त्यांनी आपल्यावर होणारे सर्व अत्याचार पुरावा म्हणून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. हेच सर्व पुरावे अखेर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्याचा दावा केला जात आहे
श्वेता यांनी आपला पती दीपक रशियन मुलींची सौदेबाजी करत असल्याचा पुरावा गोळा केला होता, जो त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबीयांना दिला होता. श्वेताचा भाऊ ऋतुराज सिंह याने हा पुरावा मीडियासोबत
शेअर करताना सांगितलं की, ‘दाजी दीपक अतिशय मद्यधुंद असायचा आणि विचित्र गोष्टी करायचा. रशियन मुलींना बोलावल्याची गोष्ट लपवण्यासाठीच त्याने श्वेता दिदीची हत्या केली’.