Wednesday, May 25, 2022

कांदा दर 50 ते 60 रुपये किलोवर जाण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात महागाईचा भडका उडाला आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत.

आता या स्पर्धेत भाजीपाला देखील मागे राहिला नाही. भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आता यात भर म्हणजे जुलैमध्ये कांदा महागणार असल्याची बातमी समोर येत आहे.

जुलैमध्ये कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. नाफेडने कांदा

खरेदी सुरू केल्याने आता व्यापारी देखील मागे नसून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांद खेरेदी करत आहेत. कांद्यांची अचानक मागणी वाढल्याने पुढील एक -दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी भाव

वाढ पहायला मिळू शकते असा अंदाज आहे.मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. कोसळलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेऊन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल

को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ‘नाफेडने’ मोठा प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. नाफेड प्रमाणेच व्यापारी देखील सध्या स्वस्तात मिळणारा कांदा खरेदी करत आहेत.

नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी विक्री सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने कांद्याचे दर स्वस्त आहेत. मात्र आता

नाफेड आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीचा सपाटा लावल्याने लवकरच कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचू शकतात असा अंदाज आहे.

दुसरीकडे लिंबाचे वाढलेले दर देखील चर्चेचा विषय बनला आहे. लिंबाचे दर वाढल्याने लिंबू जवळपास जेवणातून गायबच झाले आहे. प्रति नग लिंबासाठी ग्राहकाला तब्बल दहा रुपये

मोजावे लागत आहेत. तर लिंबाचे एक कॅरट पाचशे ते सहाशे रुपयांना मिळत आहे. लिंबाचे भाव वाढल्याने ऊस आणि लिंबू शरबताच्या दरात देखील दीड ते दोनपट वाढ झाली आहे.

लिंबासह इतर भाजीपाल्याचे दर देखील वाढले असून, वाढत्या महागाईचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!