Friday, May 20, 2022

मोठी बातमी:नगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेला पुन्हा वेग 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच या बदलाचे संकेत दिल्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन पालकमंत्री

कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पालकमंत्री मुश्रीफ यांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपूर्वीच होती. मात्र त्यास अधिकृत असा कोणीही दुजोरा दिला नव्हता. स्वतः पालकमंत्री

मुश्रीफ यांना मात्र हा बदल हवा आहे. त्यांचा मतदारसंघ कागल आहे. तेथून नगरचे अंतर फार आहे. त्यामुळे ते नियमित येऊ शकत नाहीत. कोरोनाचा कहर सुरू असतानाही ते महिना-दोन

महिन्यातून एकदा येऊन आढावा घेऊन जात असत. ते नियमित येत नसल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्यानंतरच पालकमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन महिने झाले ही

चर्चा थंड झाली होती. आता पुन्हा या चर्चेने डोके वर काढले आहे. त्याला कारणही स्वतः मुश्रीफ हेच आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त ते नगरला असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी याचे संकेत दिले. ‘मी कोल्हापूर

जिल्ह्यातील आहे. कोल्हापूर ते नगर हे अंतर फार आहे. तसेच आता विविध निवडणुका असल्याने जिल्ह्यात लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरला कदाचित नवीन पालकमंत्री मिळू शकतो. मात्र

पालकमंत्री कोण असेल, हे श्रेष्ठीच ठरवतील,” असे ते म्हणाले. भर दिवाळीत येथील जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना अतिदक्षता विभागास आग लागली होती. त्यात १४ बळी गेले. त्याच्या चौकशीसाठी सरकारने

समिती नेमली होती. आठ दिवसात अहवाल जाहीर करू, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र अद्याप या अग्नितांडवाचा अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्याबाबतही त्यांना विचारले असता

या अहवालाबाबत आपणही अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘’पुढच्यावेळी मी येऊन त्यावेळी हा अहवाल काय आहे, याची माहिती देईल. मी जरी पालकमंत्री नसलो तरी नवीन पालकमंत्री

याची माहिती देईल,” असे सांगून मुश्रीफ यांनी वेळ मारून नेलीच, शिवाय पुन्हा एकदा पालकमंत्री बदलू शकतो, असे संकेत दिले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!