माय महाराष्ट्र न्यूज:ज्या सभागृहातून देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात, देशाचा कारभार चालवण्याबाबत चर्चा केली जाते त्याच सभागृहात म्हणजेच संसदेमध्ये लोकप्रतिनिधींनी पॉर्न फिल्म पाहिल्याच्या
अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना आता ब्रिटनमध्ये घडली आहे. एका खारदाराने संसद सभागृहामध्ये पॉर्न फिल्म पाहिल्याची धक्कादायक घटना
समोर आली आहे. ब्रिटिश संसदेमध्ये घडलेली ही लाजिरवाणी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटन सरकारमधील एका महिला खासदाराने
एका पुरुष खासदारावर सभागृह सुरु असताना पॉर्न फिल्म पाहत होते असा आरोप केला आहे. ‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या संसदेतील एक खासदार सभागृह सुरु असताना
आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहत होते. खासदाराचे हे कृत्य पाहून एक महिला खासदार खूपच संतप्त झाल्या. या घटनेनंतर या महिला खासदाराने या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या घटनेवर
ब्रिटनच्या इतर खासदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या घटनेप्रकरणी ब्रिटनच्या अनेक महिला खासदारांनी आवाज उठवला आहे. एका महिला खासदाराने सांगितलं की, संबधित खासदार पॉर्न पाहत
असताना ती त्या खासदाराजवळ बसली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हे खासदार नेमके कोण आहे त्यांची ओळख समोर आली नाही. ऐवढंच नाही तर
या खासदाराने या आधी देखील सभागृहात बसून असे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या घटनेची चौकशी सुरु आहे. ‘चीफ व्हिप ख्रिस हीटन हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली याप्रकरणाची
चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अहवाल येताच आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत.
अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.