माय महाराष्ट्र न्यूज:अनेकदा काहींना रस्त्यावर पडलेले पैसे मिळतात. रस्त्यावर पडलेले पैसे अथवा नाणी उचलणे हे शुभ-अशुभ संकेत देतात.
हे पैसे उचलावेत की ाही याबाबत अनेकामध्ये संभ्रम असतो. दरम्यान, अनेकदा काहीजण हे पैसे उचलतात आणि गरजवंताना देतात अथवा मंदिरात
वैगरे दान करतात. आज जाणून घेऊया रस्त्यात मिळालेले पैसे मिळणे म्हणजे शुभ असते का अशुभ.रस्त्यावर पडलेले पैसे मिळण्याचा अर्थ धनदेवी लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे आणि लवकरच
तुमच्यावर कृपा करणार आहे. असेही असू शकते की लवकरच कुठूनहतरी तुम्हाला पैसे मिळू शकतात.रस्त्यावर नोट मिळणे याचा अर्थ तुमची मोठी समस्या टळली आहे. सोबतच लक्ष्मी
मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात मोठा आनंद येणार आहे.जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करत आहात आणि त्या दरम्यान तुम्हाला रस्त्यावर पडलेले नाणे सापडले तर याचा अर्थ आहे की तुम्ही
बिनदिक्कत नवे काम सुरू करू शकता आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. सोबतच जुन्या आर्थिक संकटातून सुटका मिळेल असाही इशारा आहे.जर घराच्या बाहेर जाता रस्त्यात नाणे अतवा नोट
मिळाली तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहे त्यात जरूर यश मिळेल. तसेच कामावरून घराच्या दिशेने परतताना पैसे मिळाले तर लवकरच तुम्हाला मोठा लाभ होण्याचे पूर्व संकेत आहेत.
जर रस्त्यात पैशांची भरलेले पाकी मिळाले तर हा मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. असेही होऊ शकते लवकरच तुम्हाला मोठी संपत्ती अथवा वारसा हक्काने काही संपत्ती मिळू शकते.
पैशांनी भरलेले पाकीट मिळाले अथवा मोठी रक्कम सापडल्यास संबंधित व्यक्तीला शोधून त्याचे पैसे परत करावे. जर त्या व्यक्तीचा शोध घेता आला नाही तर तुम्ही पैसे गरिबांना
देऊ शकते. मात्र जर तुम्हाला रस्त्यात पडलेले पैसे अथवा नोट आपल्याजवळ ठेवायची असेल तर ते आपल्याकडेच ठेवा ते खर्च करू नका. तुमच्या पर्समद्ये पैसे असणे हे लकीचार्मप्रमाणे काम करेल.