Wednesday, May 25, 2022

कोरोना झालेल्या व्यक्तीला ९० दिवसांनी पुन्हा संसर्ग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात उष्णतेची लाट आलेली असतानाच, पुन्हा कोरोनाचं संकटही घोंघावत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या वर आढळून येत आहे. देशभरात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याही तीन हजारांच्या आसपास आहे.

त्याचवेळी एका अभ्यासातून चिंतेत भर पडणारी माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, त्यांना ९० दिवसांच्या आत पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेनं हा अहवाल दिला आहे.सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेने अलीकडेच चार राज्यांतील दहा रुग्णांची अभ्यासासाठी निवड केली होती.

ज्यांना ९० दिवसांच्या आत डेल्टा या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला होता. या रुग्णांपैकी एका रुग्णाने सहा ते दहा आठवड्यांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस घेतलेले होते. तर, दोन रुग्णांनी

लशीचा एक डोस घेतलेला होता. उर्वरित सात रुग्णांपैकी काही जण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा एकही डोस घेतला नव्हता. पहिल्यांदा कोरोनाबाधित झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा

संसर्ग झाल्याचा मधला कालावधी हा २३ ते ८७ दिवस असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. अँटिजन चाचण्या घरीच करण्याचे प्रमाण वाढलेले आहे, अशी माहितीही अभ्यासातून उघड झाली आहे.

ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्हेरियंट रुग्णामध्ये आढळून येऊ शकतात, अशी शक्यताही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना

नियमांचे पालन केले तरच या महामारीपासून बचाव होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!