Friday, May 20, 2022

राज ठाकरेंच्या अटकेची मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय. लोकमान्य टिळकांनी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला,” असं मत प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केलं.

ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.प्रवीण गायकवाड म्हणाले सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचं

राजकारण झालं पाहिजे ते होत नाहीये. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे.

महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक केलं. इंदौरचे

होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या

जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतू १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला. त्याचा जीर्णोद्धाराला उपयोग झाला नाही.”

प्रविण गायकवाड पुढे म्हणाले, “न. चि. केळकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी नंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं.

त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि पुतळा बाईंच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान केला. प्रथम मी त्याचा निषेध करतो. लोकमान्य टिळकांनी

शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हा खोटा इतिहास आहे. राज ठाकरे सर्व सभांमध्ये खोटं बोलत आहेत.हे जेम्स लेनचं मूळ पुस्तक आहे. ते २००३ मध्ये आलं. हे कोर्टात होतं. या पुस्तकाच्या

पान नं. ९१ वर जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात पान नं. १२६

वर केलं आहे. येथे त्यांनी बालशिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र एक आहे असं म्हटलं. ज्या हिंदू धर्मासाठी राज ठाकरे आता रस्त्यावर उतरले आहेत त्या हिंदू धर्मात

आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असतं,” असंही गायकवाड यांनी नमूद केलं.

ताज्या बातम्या

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...

12वी उत्तीर्ण झाल्यावर मुलाला मिळणार 32 लाख रुपये, अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य आनंदी असावे असे वाटते. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, अशी पालकांची...
error: Content is protected !!