Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांच्या वडिलांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास दिला नकार चर्चेला उधाण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील सुप्त संघर्ष आता सर्वपरिचित झाला आहे. हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला

असून, आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे.

शेती आणि शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कामाबद्दल राजेंद्र पवार यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते आज या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होत असताना राजेंद्र पवारांनी या सोहळ्याला हजेरी लावलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीपेक्षा

कार्यालयातल्या शिपायाकडून पुरस्कार स्विकारेन अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी जाहीर केली आहे.दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसात झाले आहेत. ते पध्दतशीरपणे

सुरू आहेत. ज्या महान दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे लोक, या महाराष्ट्राचा इतिहास

माहीत नसणारे लोक महत्वाच्या पदावर आहेत. गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल

तर मी त्यांच्या हस्ते हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी हा पुरस्कार कृषी कार्यालयात जाऊन तिकडच्या शिपायाच्या हस्ते स्वीकारणे मला योग्य वाटेल”, असेही पवार यांनी म्हटले आहे.

हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान रयतेचे राजे या राज्यात होऊन गेले. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा आदर्श घालून दिला. अगदी राज्य करताना

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, उद्या शेतात गोंधळ घालू नका डोलकाठ्या हवे असतील तर रयतेला राजी करून घ्या असे आदेश आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी आपल्या प्रशासनाला दिले होते.

त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे.ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची बिजे रोवली. यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नक्षत्राची

लेणी फुलवली आणि महाराष्ट्र शेतीच्या बाबतीत समृद्धीच्या मार्गाने नेला. हे सारे पाहता ज्यांचा आदर्श मिरवतो ते छत्रपती शिवाजी महाराज; ज्यांच्या विचाराने आपण चालतो त्या फुले-शाहू-आंबेडकर आणि हा

पुरस्कार ज्या कामासाठी आणि ज्यांच्या नावाने दिला जातो त्याचा विचार करता हा पुरस्कार एखाद्या कृषी कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारणे योग्य झाले असतं असं राजेंद्र पवारांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!