माय महाराष्ट्र न्यूज:जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत. अनेक राज्यांनी निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र रुग्णांची वाढणारी संख्या पाहता चौथ्या लाटेची
भीती वाटू लागली आहे.दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संक्रमणाचा दर पाच टक्क्यांच्या वर गेला आहे. ओमायक्रॉनच्या तुलनेत त्याचा सब व्हेरिएंट BA.2 अधिक संक्रामक मानला जात आहे.
त्याला स्टिल्थ ओमायक्रॉनही म्हटलं जात आहे.BA.2 अधिक संक्रामक असला तरीही तो मूळ ओमायक्रॉनच्या तुलनेत गंभीर नाही. BA.2 सब व्हेरिएंट शरीरात बराच काळ राहू शकतो, असं काही तज्ज्ञ सांगतात.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.काही आरोग्य संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाची साठी
ओलांडलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. ६० वर्षे पूर्ण केलेल्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक असतो.बऱ्याच कालावधीपासून एखाद्या आजाराचा सामना
करणाऱ्यांनादेखील कोरोनाचा धोका जास्त असतो. मधुमेह, कर्करोग, अस्थमा, किडनीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते.हृदयाशी संबंधित आजार
असलेल्यांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असल्याचं अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलं आहे. कोरोना विषाणूमुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, असं अमेरिकन हार्ट असोसिएशनचा अहवाल सांगतो.इम्युनो क्रॉम्पोमाईज्ड
लोकांना कोरोनाचा अधिक धोका असतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना इम्युनो क्रॉम्पोमाईज्ड म्हटलं जातं. विषाणूशी दोन हात करण्याची क्षमता शरीरात नसल्यानं त्यांना कोरोनाची लागण अतिशय सहज होते.
स्थूल व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. स्थूलपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता वाढते.