माय महाराष्ट्र न्यूज:खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला. नराधमाने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवत
बलात्कार केला. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये कैद करुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत
घडलेला सर्व भयानक प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.खामगाव शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय
पीडित शिक्षिका या तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. पीडित शिक्षिका ज्या गावातील शाळेत कार्यरत आहेत त्याच गावाजवळील गावातील शाळेत 46 वर्षीय आरोपी शिक्षक कार्यरत आहे. आरोपी
शिक्षकाचं श्रीकांत वानखडे असं नाव आहे. पीडिता आणि आरोपी आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये कार्यरत असल्याने त्यांची खामगाव शहरापासून शाळेत जाताना भेट व्हायची. ते शिक्षकांच्या कारने
खामगावरुन ये-जा करायचे. त्यातून दोघांमध्ये चांगली ओळख झाली होती.या दरम्यान आरोपी शिक्षकाने पीडित शिक्षिकेला काहीतरी कारण सांगत निमंत्रण देत आपल्या घरी बोलावले. शिक्षिका आरोपीच्या
घरी आल्यानंतर त्याने घराचे आतील दार लावले. पीडितेने यावेळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पीडितेला काहीतरी वाईट घडणार याची जाणीव झाली. त्यामुळे तिने घराबाहेर पडण्याचा प्रचंड प्रयत्न केला.
यावेळी आरोपी वानखेडेने चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडितेचे आपत्तीजनक परिस्थितीतले फोटो काढले. संबंधित घटनेची
माहिती कुणाला सांगितली तर फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन आणि व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.