Wednesday, May 25, 2022

राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिराळा (जि. सांगली) येथील दंडाधिकारी न्यायालयाने ६ एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने मुंबई

पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले होते. पण मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.

राज ठाकरे यांच्या विरोधात २००८ मधील एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आयपीसी १४३, १०९, ११७, ७ मधील फौजदारी दुरुस्ती आणि मुंबई पोलिस कायद्यातील १३५ नुसार

हे वॉरंट बजावण्यात आले होते.राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राज ठाकरे यांना अटक

झाली होती. या अटकेचा निषेध राज्यातील ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी नोंदवला होता. शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यांनी जबरदस्तीने

दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांवर दबाव टाकला होता. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तसेच पोलिसांनी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह काही

मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पण ते सुनावणीला हजर राहिले नव्हते. यामुळे राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.याआधी राज ठाकरे

हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयानेदेखील दिला होता. २००८ रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक

करण्यात आली होती. याचा परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. दरम्यान, त्यांनी सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंटवर परळी येथे बेकायदेशीर

जमाव जमवून दगडफेक केली होती. बसच्या समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यास राज ठाकरे यांनी चिथावणी दिली होती.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!