Tuesday, May 17, 2022

नगर ब्रेकिंग: लग्न केले हनिमूनही झाले अन् पुढे जे झाले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्यातून आलेल्या एका तरुणीने अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनिमूनही केला आणि विश्वास संपादन

करून 3 लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.अमर एकनाथ जेजुरकर (वय 34) मुळगाव तनपुरे गल्ली, राहुरी हा बाभळेश्वर येथे मामाकडे राहून

मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. अमरला मात्र बायको मिळाली. अश्विनी (रा. हेळस जि. जालना) ही

तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा अमरशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह निश्चित झाला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिल रोजी लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला

हनिमूनला गेले.दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले. मात्र 30 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या बस स्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या.जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे

दागिने आणि 3 लाख रोख रक्कमही नेली. अमर घरी आला आणि त्याच्या लक्षात आले की आपल्याला विश्वास संपादन करून गंडवण्यात आले आहे.

त्याने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!