Tuesday, May 17, 2022

माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंंचा नाव न घेता खा विखेंवर निशाणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जल जीवन मिशन ही नळ पाणी योजना केंद्र सरकारची योजना आहे. या माध्यमातून विविध गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निधी दिला जात आहे.

राज्य सरकार सोयीनुसार या योजनेसंदर्भात केंद्र सरकारवर टीका करते. परंतु कोट्यवधीचा निधी याच जल जीवन मिशन योजनेंतर्गत मिळाला तर त्याचे श्रेयही महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी घेतात.

मात्र आपले खासदार तोंड का उघडत नाहीत ? केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी दिल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात खासदार कमी पडत आहेत का ? असा सवाल

उपस्थित करत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नाव न घेता खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावरच निशाणा साधत त्यांना घरचा आहेर दिला आहे.पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा

येथे शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन रविवारी माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कर्डिले

म्हणाले, ऊर्जा राज्यंमत्र्यांनी जनता दरबार घेऊन अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. या जनता दरबारातून सर्वसामांन्याचे किती प्रश्न सोडवले याची माहिती माध्यमांना द्यावी. जनता दरबाराचा

फार्स केला जात आहे. शेतकऱ्यांचा महाविकास आघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन नळपाणी योजनेंतर्गत मोठा निधी मिळत आहे त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे आमदार घेत आहेत.

योजना केंद्र सरकारची आहे तर मग खासदार का गप्प आहेत. केंद्र सरकारच्या योजनेमुळे कोटयवधी रुपयांचा निधी मिळत असेल त्याचबरोबर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असेल ते जनतेला सांगण्यात

खासदार कमी पडत आहेत की काय असा सवाल कर्डिले यांनी उपस्थित करत. मंत्री तनपुरे बरोबरच खासदार विखेंवरही निशाणा साधल्याने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

युवा नेते कुशल भापसे यांनी माजी आमदार बाबुराव भापसे, प्रमोद भापसे व आमदार प्रसाद लाड यांच्या प्रेरणेने पाथर्डी तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत १४ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे

वाटप, ५१ अनाथ मुलांचे बारावीपर्यंत मोफत शिक्षण असे राबवलेले समाजाभिमुख सामाजिक उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे कर्डिले यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!