Tuesday, May 24, 2022

पत्नी कॉल गर्ल असल्याचं सांगून पतीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राजस्थानमध्ये पती-पत्नीच्या नात्याला लाज आणणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचेच आक्षेपाह्र फोटो आणि व्हिडीओ शूट करू सोशल

मीडियावर पोस्ट केली. याशिवाय पत्नीला कॉल गर्ल असल्याचं सांगून तिचा मोबाइल नंबरदेखील पोस्ट केला. ही पोस्ट व्हायरल होताच पत्नीला अज्ञातांचे कॉल येऊ लागले. यानंतर

पत्नीला पतीचं धक्कादायक कृत्य कळालं. यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळी तिने पती आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली.

विवाहित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सांगितलं की, पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि घराबाहेर काढलं होतं. या प्रकरणात तिने आधीही तक्रार दाखल

केली होती. हे प्रकरण अद्यापही न्यायालयात विचारधीन आहे. यामुळे रागावलेल्या पतीने पत्नीला बदनाम करण्यासाठी 4 आणि 6 एप्रिल रोजी यूट्यूब चॅनलवर बनावटी आयडीमधून फोटोत फेरबदल करीत

फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केले. व्हिडीओमध्ये पीडितेसाठी कॉल गर्ल सारख्या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय खाली मोबाइल नंबरदेखील लिहिला आहे.

पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीच्या या कृत्यामुळे तिला अज्ञातांकडून वाईट फोन कॉल येत आहेत. लोक फोनवर घाणेरडं बोलत आहेत. यामुळे तिला खूप त्रास झाला. पीडितेचा आरोप

आहे की, पतीने माझी बदनामी करण्यासाठी हे कृत्य केलं. या कटात सासूचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पीडितेने केली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!