Friday, May 20, 2022

महाराष्ट्रात याठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात विदर्भात अजूनही उष्णतेचा कहर सुरूच आहे. मात्र, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा

अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर या सर्वच भागात उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.राज्यात गेल्या दोन महिन्यापासून

उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसाने ओढ दिल्यामुळे उष्णता वाढण्यास मदत झाली आहे. दरम्यान पश्चिम विदर्भापासून ते तामिळनाडूपर्यत द्रोणीय स्थिती आहे. ही स्थिती

तेलंगण व रॉयलसीमा पार करून पुढे गेली आहे. तर, अंदमान समुद्रात सध्या चक्रीय स्थिती आहे. या स्थितीचे रूपांतर ६ मे रोजी कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस

अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. ५ मेनंतर पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.दरम्यान, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात

हवामान कोरडे होते. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या

तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मंगळवारी दिवसभरात राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात

तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.

ताज्या बातम्या

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...

12वी उत्तीर्ण झाल्यावर मुलाला मिळणार 32 लाख रुपये, अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य आनंदी असावे असे वाटते. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, अशी पालकांची...
error: Content is protected !!