Wednesday, May 25, 2022

भेंडवळची भविष्यवाणी, शेती, पीक व पर्जन्यमानावर केले हे भाकीत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात चांगला पाऊस पडणार का? शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आज अनेक जण उत्साहित होते. अखेर आज त्या

भेंडवळची भविष्यवाणी झाली आहे. 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळच्या

या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर

महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचेही या भविष्यवाणीत म्हटले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रधान व्यक्तीवर

आर्थिक संकट येईल असेही भाकीत या भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे.सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या

भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा,

खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही

पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर

आजही शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे.भेंडवळच्या भविष्यानुसार जून आणि जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होईल

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावेळी अवकाळी पाऊसही पडणार आहे म्हणून शेतकर्‍यांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. वार्षिक पीक परिस्थितीच्या

भाकीनुसार यंदा तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल. तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस

होण्याची शक्यता जास्त असेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे. तीळ हे तेलवा

नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील. भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे/ ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील.

मटकी पण साधारण राहील साडी म्हणजे तांदळाचे साधारण चांगले असेल. लाख हे पिक सर्वसाधारण असेल तर वाटाणा सुद्धा सर्वसाधारण नसेल. गहू हरभऱ्याचे पीक ह्या वर्षात चांगले राहणार असून करडीचे पीक सुद्ध चांगले राहणार आहे.

कोरडी हे पीक देशाच्या संरक्षणाचे भाकीत वर्तवताना संरक्षण खात्यावर जास्त तान संभवतो. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक असून घुसखोरी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशाच्या प्रधानावर आर्थिक संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.

देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील. देशाच्या राजाची गादी कायम राहणार राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!