माय महाराष्ट्र न्यूज:पत्नीला अनैतिक संबंधांना विरोध केल्यावर पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडली.
रंजित यादव असे मृत पतीचे नाव आहे. पोलीस दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. अखेर झाझा ठाणे परिसरातील ताराकुरा जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. तर यानंतर
हत्येचा आरोप मृताच्या सासरच्या लोकांकडे लावण्यात आला आहे. दहा जणांवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून आरोपी पत्नीसह बाकी फरार आहेत.
यादव यांच्या पत्नीचे तिच्या मोठ्या बहिणीच्या पतीशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांना रंजित नेहमी विरोध करत होते. मृताचे भाऊ सुभाष यांनी सांगितले की, रविवारी रंजित सासरी गेले होते.
मात्र, ते घरी परत आलेच नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. यानंतर पोलिसांना तपास करताना त्यांचा मृतदेह सापडून आला.मिळालेल्या माहितीनुसार, रंजितकुमार यादव हे रविवारी सासरच्या
घरी गेले होते. येथे त्यांनी त्यांच्या पत्नीला मेव्हण्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. तसेच याचा विरोध केल्यानंतरही त्यांना सासरी वाईट पद्धतीने बोलण्यात आले. यानंतर रविवारी
सकाळी 11 वाजताच्या सुमारास रंजित यांनी सुभाषला फोन करुन त्यांना सासरी चुकीची वागणूक देण्यात येत आहे.त्यांच्यासोबत इथे आणखी आपत्तीजनक घटना घडू शकते.
यानंतर जेव्हा सोमवारी रंजित घरी परत नाही आले तेव्हा सुभाषने पोलिसात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असता, जंगलात आधी रिक्षा आढळली.
यानंतर रंजितचा मृतदेह आढळला. सुभाष यांनी सांगितले की, रंजित यांच्या साडूचे रंजित यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. याला रंजित नेहमी विरोध करत होते.