Tuesday, May 24, 2022

रासायनिक खताच्या किंमती जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खरीप हंगामातील नियोजनापेक्षा यंदा रासायनिक खताचा पुरवठा आणि वाढत्या दराचीच अधिकची चर्चा आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे खताचा

पुरवठा होणार की नाही शिवाय झाला तरी वाढत्या दराचा काय परिणाम होणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. पण निर्माण झालेल्या परस्थितीवर (Central Government)

केंद्र सरकारने चांगला तोडगा काढला असून शेतकऱ्यांना पुरवठा तो देखील कमी किंमतीमध्ये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच रासायनिक खताच्या अनुदान रकमेत वाढ करण्यात आली आहे.

यंदा खतावर 60 हजार 939 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे दरवाढ झाली तरी त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार नाही.IFCO ही सरकारी मालकीची खताची कंपनी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे साहजिकच खताचे दरही वाढणारच आहेत पण ही कंपनी खताचे दर वाढवणार नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शेतकऱ्यांचा विचार करीता खत दरवाढीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये याची खबरदारी केंद्र सरकारने घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजारात खताची किंमत खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती जास्त असल्याने सरकार शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देते.जेणेकरून देशातील शेतकरी खते खरेदी करू शकतील.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!