Tuesday, May 24, 2022

साईंची काकड आरती भोंग्यांवर करू द्या”; शिर्डीत मुस्लीम समुदायाची मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन पुकारलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या

आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या ३ मे च्या अल्टिमेटमनंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते

आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक ठिकाणी भोंगे बंद करण्यात आले. शिर्डीमध्येही मशिद आणि मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे साई मंदिरातील पहाटेच्या काकड

आरतीसाठी लाऊडस्पीकरवर वापरण्यात आले नाही. दरम्यान, आता मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

साई मंदिरावर भोंगे लावण्यात आले असून त्यातून दररोज काकड आरती आणि शेजाआरती होते. परंतु मनसेच्या आक्रामक भूमिकेनंतर मशिदीसह मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते.

त्यामुळे मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास

परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!