Monday, May 23, 2022

माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले, या अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बिग बॉस 5′ मध्ये दिसलेली अभिनेत्री पूजा मिश्रा (Pooja Mishra) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने चक्क सुप्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC)

लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा मिश्राने सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य

उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर पूजाने शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा दावाही केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी मला बेशुद्ध करून माझ्या

शरीराचा व्यापार करत माझे कौमार्य विकले आणि या सेक्स स्कॅमच्या आधारे स्वत:ची मुलगी सोनाक्षी हिला स्टार बनवले. हा अत्याचार मी 17 वर्षांची असल्यापासून सहन केला आहे. माझ्या जागी

दुसरी कोणी असती तर तिने आत्महत्या केली असती, असा गौप्यस्फोटही तिने यावेळी केला आहे.पूजा मिश्राच्या या आरोपांनी बॉलिवूड आणि राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. पूजा मिश्राने

या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जे आरोप केले आहेत, ते अतिशय धक्कादायक आहेत. मात्र, यावर शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पूजा मिश्रा म्हणाली, ‘बॉलीवूडमधील एका कुटुंबाने माझे करिअरच नाही तर वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्यही उद्ध्वस्त केले. मी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलतोय. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते.

माझे वडील आयकर आयुक्त होते आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र मंडळासाठी 100-100 कोटींची मदत केली. दोन दशके झाली पण हात धुवून हे कुटुंब माझ्यामागे लागले आहे.

माझे वडीलांचे मुंबईत पोस्टींग होते, तेव्हा पूनम सिन्हा यांनी त्यांचे ब्रेनवॉश केले. बॉलीवूडमध्ये फक्त वेश्याच काम करतात असं त्यांनी म्हटलं होतं. पण आज त्यांचीच मुलगी सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडमध्ये काम करत आहे.

त्यांनी माझा पत्ता कट करण्यासाठी माझ्या वडिलांचे कान भरले.पूजा मिश्रा पुढे म्हणाली की, 2005 मध्ये माझे वडील निवृत्त होऊन पुण्यात आले तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी

मला उघडपणे दडपले. उलट मी जेव्हा व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे. मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये

ही असुरक्षितता त्यांच्या मनात नेहमी असायची. म्हणूनच आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा या लोकांनी माझे 35 चित्रपट चोरल्याचे मला जाणवते. या लोकांनी माझे मार्ग रोखले. स्वतःला

वाचवण्यासाठी हे लोक मला खोटी माहिती देतात. तुझ्याबाबतीत आम्ही काही नाही केले असे सांगून सलमान खान आणि शाहरुख खानने तुला उद्ध्वस्त केल्याचे ते सांगतात.पूजा मिश्राने

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे ‘लोभी’ आणि ‘राक्षस’ असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, ‘2009 मध्ये मी शत्रुघ्न सिन्हांच्या घरी गेले होते. त्याचा वाढदिवस येणार होता म्हणून मी त्याच्यासाठी

भेट म्हणून मेणबत्त्या घेतल्या होत्या. बॉलिवूड इंडस्ट्री असुरक्षित आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण पूनम सिन्हा वेगळ्या पातळीवर असुरक्षित आहेत. त्यावेळी एका मुलीने मला काहीतरी

खायला दिले आणि माझ्यावर काळी जादू केली. याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. यावरून हे लोक किती लोभी आणि राक्षसी आहेत हे दिसते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!