Friday, May 20, 2022

सहकारी शिक्षिकेला बोटाने तसा इशारा केला मग काय पुढे सुरू झाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:धौलपूर जिल्ह्यात लैंगिक छळाची घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेने तिच्या सहकारी शिक्षकावर गंभीर आरोप केला आहे. तिने याबाबत संबंधीत शाळेच्या

प्रशासनाला लिखित तक्रार दिली आहे. आरोपी शिक्षक प्रकरण मिटविण्यासाठी धमकी देत आहे. यामुळे ती घाबरलेली आहे.सरकारी शाळा असल्याने शिक्षिकेने विभागिय कार्यालयातही

तक्रार दिली आहे. मात्र, आरोपी शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर शाळेत शिक्षिकाच सुरक्षित नसतील तर तिथे शिकणारी मुले-मुली कशी सुरक्षित राहू शकतील, असे या शिक्षिकेचे म्हणणे आहे.

तिने पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.या महिला शिक्षिकेच्या तक्रारीनुसार २ एप्रिलची ही घटना आहे. तिथे आरोपी शिक्षकाने तिला बोट दाखवून अश्लिल इशारा केला. मी पहिल्यांदा

त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतू दुसऱ्यांदा त्याने तसेच केले, ही बाब तिथल्या सहकारी शिक्षकांनीही पाहिली. शिक्षकांची बैठक सुरु होती, ती संपल्यावर तिने त्या शिक्षकाला पुन्हा असे न करण्यास बजावले. यावर

तो भडकला आणि हात पकडून धमकी द्यायला लागला. यावेळी शाळेत आलेल्या एका गेस्टने ते पाहिले आणि मला त्याच्या तावडीतून सोडविले, असे या शिक्षिकेने म्हटले आहे.या घटनेची तक्रार केल्यानंतर

शाळा प्रशासनाने त्या शिक्षकावर कारवाई करण्याचे सोडून तिच्यावर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकत आहे. शिक्षकाकडून तिला सतत धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे.

याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी केली जात आहे.शाळेचे मुख्याध्यापक योगेश मीना यांनी सांगितले की, एका शिक्षिकेने

शाळेतीलच एका शिक्षकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. समितीने चौकशी करून अहवाल प्रादेशिक कार्यालय, जयपूरला पाठवला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!