माय महाराष्ट्र न्यूज:आज नांदेडमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांच्यासमोर जे घडलं, त्यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे. यावेळी या कार्यक्रमात
फक्त थोरातच नव्हते तर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त गोविंद केंद्रेकरही उपस्थित होते. यावेळी इथल्या तहसीलदारांनी हसत हसत जो टोला लगावला आहे, तो आता चर्चेत आहे.
मराठवाड्यातील लोकांना काही काम धंदे नाहीत, त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. असे वादग्रस्त वक्तव्य नांदेडच्या तहसीलदारांनी केलंय. विभागीय
क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने महसूलमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधीच्या समक्ष तहसीलदाराने अश्याप्रकारे वक्तव्य केल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय. भ्रष्टाचाराच्या अभ्यासपूर्ण तक्रारी
असतील तर त्यात गैर काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.हे वक्तव्य करणाऱ्या तहसील दारांचं नाव आहे. किरण आंबेकर. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्येच कार्यरत असलेल्या
तहसीलदार किरण आंबेकर यांचे भर सभेतील हे वादग्रस्त वक्तव्य चांगलच चर्चेत आलय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात त्यांचा निषेध नोंदवला जातोय. या सभेत बोलता बोलता, हसत हसत
आंबेकर म्हणाले. ” मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण फार जास्त आहे. असे म्हटल्यानंतर साहेबांनी मला विचारलं की हे कशामुळे जास्त आहे. तर मी सांगितलं मराठवाड्यात थोडी परिस्थिती बिकट आहे.
लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या मराठवाड्यात फार वाढली आहे. त्यामुळे या तक्रारी होत आहेत. यात कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात.
तसेच यातले काही आरोप सत्यही असतात, असे ते म्हणाले.