Wednesday, May 25, 2022

शनिशिंगणापूर देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय, झाला ‘हा’ मोठा बदल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शनिशिंगणापुरात पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार वाढणाऱ्या तक्रारीची दखल अखेर देवस्थाननं घेतली आहे.

पूजा साहित्यात देण्यात येणाऱ्या यंत्राची तक्रार भाविकानं थेट राज्य सरकारला केल्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानने पुजासाहित्यातील सर्व यंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला

आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिलीदेवावरील श्रद्धेचा फायदा घेत पुजासाहित्यातील यंत्राच्या माध्यमातून भाविकांची दिशाभूल केली जात होती. अव्वाच्या-सव्वा पैसे भाविकांकडून

उकळले जात असल्याने देवस्थानने यंत्र बंदीचा धाडसी निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरू केली आहे. 30 एप्रिलच्या शनिवार रोजीच्या अमावस्या यात्रेत मंदिर परीसरात यंत्राचा सडा पडला होता.

पायदळी पडणाऱ्या यंत्राने पावित्र्य बिघडत आहे, अशी तक्रार भाविकांनी राज्य सरकारला केली होती.यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेवून पुजेच्या ताटातील नवग्रह यंत्र, शनियंत्र, शिक्का व कलश यंत्र

मंदिरात घेवून जाण्यास बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे मंदिर परिसरात आणि रस्त्यावर पडलेल्या यंत्रांमुळे पावित्र्या बरोबर भाविकांच्या पायाला देखिल दुखापत होत होती. मंदिर परिसरात भाविक

अनवानी पायानं असतात, लहान मुलांना या यंत्राचा अधिक त्रास होत होता. त्यामुळे शनैश्वर देवस्थाननं सर्व पुजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सुचित केलंय. तर त्याचबरोबर या वस्तू मंदिरात

जाणार नाही याकरीता सुरक्षा विभागाचे पथक महाद्वारमध्ये ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!