Wednesday, May 25, 2022

रोजच्या वापरातील ‘या’ वस्तू महागणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. साबण, शॅम्पू, पावडर यासह

अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. CNBC TV-18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठा FMCG ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हर ने आपल्या उत्पादनांच्या किमती

15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. मनीकंट्रोलने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.रिपोर्टनुसार, 125 ग्रॅम पिअर्स साबणाच्या किमतीत 2.4% आणि मल्टीपॅकमध्ये 3.7% ने वाढ झाली आहे.

काही मल्टीपॅक प्रकारांसह लक्स साबणाची किंमत 9% वाढली आहे. कंपनीने सनसिल्क शॅम्पूच्या किमतीतही 8 ते 10 रुपयांनी वाढ केली आहे. Clinic Plus Shampoo 100 ml च्या किंमतीत 15% वाढ करण्यात आली आहे.

साबण आणि शॅम्पू व्यतिरिक्त, स्किन क्रीम ग्लो अँड लव्हलीच्या किमतीत 6-8% वाढ झाली आहे. पॉन्ड्सच्या टॅल्कम पावडरच्या किमतीतही 5 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदुस्तान

युनिलिव्हर लिमिटेडने एप्रिलमध्ये त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत शेवटची वाढ केली होती. एफएमसीजी ब्रँड्सच्या या मोठ्या कंपनीने स्किन क्लीनिंग आणि डिटर्जंटच्या किमती 3-20 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

2 मे रोजी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत, HUL CEO आणि MD संजीव मेहता म्हणाले की, त्यांनी कंपनीत घालवलेल्या 30 वर्षांत इतकी महागाईची परिस्थिती पाहिली नाही.

त्यांना नजीकच्या भविष्यात आणखी कठीण काळ येऊ शकतो, परंतु त्यांना विश्वास आहे की भारत FMCG कंपन्यांसाठी एक मोठी बाजारपेठ बनून राहील आणि या कठीण

काळाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!