माय महाराष्ट्र न्यूज:शेती, शेती आणि सिंचन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हवामानाचा अंदाज मराठीसह अन्य 24 सोप्या भाषेत सांगणारे अॅप आता लवकरच उपलब्ध होणार आहे.
भारतीय हवामान विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्तपणे ही प्रणाली विकसित करण्यात येत असून ती लवकरच शेतकर्यांसाठी उपलब्ध होणार आहे.भारतीय हवामान
विभाग (आयएमडी) आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने ही प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण, शहरी आणि जिल्हा स्तरावरील नागरिकांसाठी हवामानाचे
अंदाज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या प्रणालींची निर्मिती केली जाणार आहे.देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात
कमी जास्त पणा आढळून येत आहे. देशातील सर्वात जास्त तापमानाची नोंद महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात नोंद झाली आहे. काल (दि. 04) 44.5 अंस सेल्सिअंस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान आज उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.