Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग: आधी 32 वर्षीय मामीवर नंतर मामीच्या अल्पवयीन मुलीवर भाच्याने केला बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात मामी भाचा या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

चक्क 32 वर्षीय मामीवर आणि मामीच्या अल्पवयीन मुलीवर भाच्याने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवार दि. 27 एप्रिल 2022 व वर्षभरात वेळोवेळी

झाल्याचे पीडितेच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. याप्रकरणी खुद्द मामीने आपल्या भाच्याच्या विरोधात 2 मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नराधम भाच्यास संगमनेर तालुका पोलिसांनी

तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहे.संगमनेर तालुक्यातील

वडगावपान परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगी होती. त्याच परिसरात पिडीत महिलेची नणंद असल्याने त्यांचे नेहमी घरी जाणे येणे होते. पिडीत महिलेचा भाचा देखील

वेळोवेळी घरी येत जात होता. पण, हळूहळू त्याची नियत मामीवर फिरली. भाचा एकदिवस मामीच्या घरी आला व त्याने तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. व धमकी देत तो म्हणाला की, तू माझी

इच्छा पुरी केली नाहीतर मी तुझ्या मुलीला व नवऱ्याला ठार मारील. त्यामुळे त्याच्या दबावाला आणि धमक्यांना मामी बळी पडली. नराधम भाच्याने या धमकीचा फायदा उचलत मामीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला.

दरम्यान, तो नराधम भाचा मामीच्या घराकडे वेळोवेळी येऊ लागला. त्याला चांगलीच चटक लागली होती. त्यामुळे, या नराधमाची नजर मामीच्या अल्पवयीन मुलीवर देखील पडली. आरोपी भाचा

याची काल मामीवर असणारी नजर आता त्याच घरात असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर देखील नेहमी पडत होती. मात्र, एक जवळचा विश्वासू व्यक्ती म्हणुन त्याच्यावर कोणी काही शंका घेतली नाही.

मात्र, सगळ्यांना चुकवून त्याची तिच्यावर कायम वाईट नजर होती. बुधवार दि. 27 एप्रिल रोजी सर्वजण रात्री जेवण करून झोपले होते. तेव्हा 12:30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी भाच्याने घरात शिरकाव केला.

तेव्हा या हैवनाची नजर अल्पवयीन मुलीवर पडली. अल्पवयीन मुलीला पाहुन या नराधमाची नियत फिरली आणि घरात एकांत पाहुन त्याच्यातील वासनांध राक्षस जागा झाला. आणि त्याने अल्पवयीन

मुलीच्या बिछान्यात शिरुन पिडीत मुलीवर अनन्वित अत्याचार केले. दरम्यान, हे पीडित मुलीच्या आईने पाहिले असता त्यांनी आरोपीला विरोध केला. पण, आरोपी भाच्याने पिडीत मामीला धमकी दिली. तुझे व्हिडीओ तयार

करून व्हायरल करील. असे म्हणून पुन्हा नराधम भाच्याने मामीवर अतिप्रसंग केला. हा सर्व अत्याचारी व हतबल थरार झाल्यानंतर आरोपी म्हणाला की, हा प्रकार कोणाला सांगितला तर

तुझ्या नवऱ्याला व मुलीला ठार मारून टाकील अशी धमकी देत निघुन गेला. मात्र, पिडीत मामीचा राग अनावर झाला. तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी आपल्या नराधम भाच्याला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. तालुका पोलिसांनी तात्काळ नराधम भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.

याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!