भेंडा प्रतिनिधी राहुल कोळसे :नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी स्थापित केलेले व प्रवरा मातेच्या कुशीत असलेले भगवान
श्रीदत्तप्रभूंचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे महंत हभप भास्करगिरीजी महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी कृष्णा महाराज मते यांची देवगड देवस्थानचे
उत्तराधिकारी म्हणून निवड केली. कृष्णा महाराज मते यांना दीक्षा समारंभ आज दि.6 मे 2022 रोजी श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथे संपन्न झाला. कृष्णा महाराज मते यांचे महंत
प्रकाशानंदगिरी महाराज असे नवे नामकरण करण्यात आले. कृष्णा महाराज मते यांना पंच गुरूंनी दीक्षा दिली.कार्यक्रमासाठी संपूर्ण देवगड परिसर सडा, रांगोळी, फुलांनी सजवण्यात आले होते.उत्तराधिकारी
पंच संस्कार दीक्षा सोहळा हा वेदशास्त्रसंपन्न गणेशगुरु ज्ञानेश्वर नगर यांच्या पौरोहित्याखाली श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर, श्रीक्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र राक्षस भुवन, श्रीक्षेत्र प्रवरासंगम आदी तीर्थक्षेत्राहून ब्रह्मवृंद यांनी
होमहवन व विधीवत धार्मिक कार्यक्रम केले.कार्यक्रमासाठी राज्यासह देशभरातील संतांना निमंत्रित करण्यात आले होते तसेच या प्रसंगी जुना आखाडाचे वेदव्यास पुरी जी महाराज, महंत देवेंद्रजी गिरी महाराज,
महंत भास्करगिरी महाराज, महंत शिवानंदजी गिरी, महंत नारायनगिरीजी महाराज, महंत विश्वभर गिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई पाटील आदी उपस्थित होते.