Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग मोठा अपघात:६ जण जागीच ठार तर सात जखमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान कंटेरनर क्रमांक पी बी ०५ एबी ४००६ या कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला

कट मारुन प्रवाशी वाहतुक करणाऱ्या रिक्षा क्रमांक एम एच १७ ए जे ९०५६ हिला जोराची धडक दिल्याने रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकल

वरील तिघं असे ७ जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये १) राजाबाई साहेबराव खरात वय ६० वर्षे रा. चांदेकसारे, ता कोपरगाव २) आत्माराम जम्मानसा नाकोडे वय ६५ वर्षे रा. वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक

३) शैला शिवाजी खरात वय ४२ वर्षे रा.श्रीरामपुर ४ ) शिवाजी मारुती खरात वय ५२ रा. श्रीरामपूर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५) पुजा नानासाहेब गायकवाड वय २० वर्षे रा. हिंगणवेढे, ६) प्रगती मधुकर होन वय २० वर्षे रा. चांदेकसारे, तालुका कोपरगाव यांचा समावेश आहे.

तर रिक्षातील जखमींमध्ये विलास साहेबराव खरात वय ३४ वर्षे रा. चांदेकसारे, तालुका कोपरगाव, कावेरी विलास खरात वय ५ वर्षे रा. चांदेकसारे, रुपाली सागर राठोड वय ४० वर्षे रा. सिन्नर, जिल्हा नाशिक,

धृव सागर राठोड वय १७ रा. सिन्नर तसेच मोटार सायकल वरील दिगंबर चौधरी वय वर्षे 42 यांच्यासह त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी वय १२ वर्षे आणि बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी

वय ४२ वर्षे सर्व राहणार पोहेगाव, तालुका कोपरगाव, हे किरकोळ जखमी आहेत.अपघाताची माहिती समजताच कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरील दृश्य बघून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सुद्धा गहिवरून आले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तर सर्व

जखमींवर एस.जे.एस रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात झाला त्यावेळी रिक्षामध्ये एकूण दहा जण होते. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघात करुन कंटेनरचा चालक दर्शनसिंग वय ४२ रा. दानामंडी लुधियाना पंजाब हा नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला झगडे फाटा येथुन ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!