माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून 60 वर्षांपुढील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वासाने जगण्याची उभारी मिळाली आहे.
या योजनेला केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी दिल्याने देशातील जनतेला मोठा विश्वास मिळाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.बेलापूर बु॥ येथे
केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्षांपुढील 717 दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअर, चष्मे, वॉकिंग स्टिक, दातांची बचळी, कुबड्या आदी चौदा प्रकारच्या साहित्याचे वाटप मंत्री कपिल पाटील
यांच्या हस्ते आणि नगरचे भाजप खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.खा. डॉ. सुजय विखे पा. हे नगर जिल्ह्यातील लोकांची
पिडा पारखणारे खरे जवाहिर आहेत त्यांनी नगर जिल्ह्यात वयोश्री योजनेत मोठे काम करीत 40 कोटींचा निधी गरजूंपर्यंत साहित्याच्या द्वारे पोहोचविला त्याबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक
स्वतः पंतप्रधान मोदींनी केले. त्यामुळे त्यांना भविष्यात देशपातळीवर काम करण्याची संधी मिळेल असे सूतोवाच ना. पाटील यांनी यावेळी केले.डॉ. सुजय विखे आपल्या भाषणात म्हणाले की, देशाला
एक संवेदनशील पंतप्रधान लाभल्याने देश सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. जोपर्यंत त्यांच्यासारखे सक्षम नेते आहेत तोपर्यंत देशवासियांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असा
विश्वासही त्यांनी व्यक्त करीत 2024 मध्येही जनतेने मोदींच्या नैतृत्वाची गरज ओळखून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.