माय महाराष्ट्र न्यूज:सरकार लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना
सुरू केली होती. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा हप्ता तीन टप्प्यात येत असतो
त्यासाठी सरकारने यावर्षी PM किसान योजनेची देशभरातील लाभधारी शेतकऱ्यांना e-KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी
योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC आता 22 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुभा असणार आहे.
यापूर्वी e KYC करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. PM किसानचा पुढचा हप्ता या महिन्यात कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर 2000 रुपयांचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
पीएम किसान या पोर्टलवर (pmkisan.gov.in) एक संदेश प्रसारित केला जात आहे. त्यात म्हटले आहे की पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. यासाठी आधारच्या OTP
प्रमाणीकरणाकरिता किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधावा लागतो.दरम्यान UIDAI कडून प्राप्त झालेल्या
अधिसूचनेनुसार, UIDAI च्या OTP सेवा जारी केल्यामुळे, OTP सत्यापित करत असताना पुढील प्रतिसाद मिळण्याकरिता विलंब होत आहे. यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी
31 मार्च 2022 ही अंतिम तारीख बदलण्यात आली आहे.