Tuesday, May 24, 2022

या केंद्रीय मंत्र्यांची पुन्हा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं विधान केलं आहे. रामदास आठवले

यांना २०१४ साली भाजपाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आलं आहे. तसंच रामदास आठवले हे सध्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून

कारभार पाहत आहेत. रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला भेट दिली. विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते संगमनेर तालुक्यात आले होते.

यावेळीच त्यांनी त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांना शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवायची

असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे.  २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी रामदास आठवले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली रामदास

आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता. शिर्डी हा मतदार संघ त्यावेळी

आघाडीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक मतदार संघ मानला जात होता. त्यामुळे शिर्डीसारख्या सुरक्षित मतदार संघात झालेला पराभव तेव्हा रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर

नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडलं होतं. तत्कालीन कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी जबाबदार धरले होते. शिर्डीमधून

मला आपल्याच नेत्यांनी पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता रामदास आठवले भाजपासोबत आहे आणि २००९ साली रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी

ज्यांना जबाबदार धरले होते ते राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा आता भाजपामध्ये आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांनी आता मला शिर्डीत मदत कराल ना ? असा गमतीने प्रश्न विचारला होता.

रामदास आठवले आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात आहेत. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यावेळी त्यांना मदत करणार का यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!