Wednesday, May 25, 2022

गर्भनिरोधकांच्या वापरात मोठी वाढ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये आरोग्य मंत्रालयाने भारतातील 28 राज्यं, 8 केंद्रशासित प्रदेश, 707 जिल्ह्यांमधील

सुमारे 6.37 लाख घरांचं सर्वेक्षण केलं. या अहवालावरून भारतात 15 वर्षांवरील लोकसंख्येतील पोषण, स्वच्छता, दारू, तंबाखूचे सेवन, रक्तदाब, उच्च रक्तदाब यासारख्या जीवनशैलीतील

आजारांची स्थिती काय आहे, याची माहिती मिळाली आहे. या सर्व्हेतून भारतातील लोकसंख्या नियंत्रणात आल्याचं समोर आलंय. भारतात आता प्रत्येक महिलेच्या सरासरी 2 मुलं आहेत. तर

गेल्या सर्वेक्षणात प्रति महिला सरासरी 2.2 मुले होती. भारतातही गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आलंय. 2015 मध्ये 54% लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर केला होता, तर 67% लोक आता गर्भनिरोधक पद्धती वापरत आहेत.

सध्याच्या महामारीचं न संपणारं सत्र, बदललेल्या जीवनशैलीमुळे धोक्यात येणारं आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीतील असमतोल या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार

करत सध्याची पिढी एकतर गर्भनिरोधकांना प्राधान्य देते किंवा मूल होण्याचे बेत आखण्यास दिरंगाई करताना दिसते.पूर्वी 60 टक्के स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत

क्लिनिकमध्ये जात होत्या, आता हे प्रमाण वाढलं असून 70 टक्के महिला क्लिनिकमध्ये जातायत. सध्या भारतात 89 टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याची नोंद आहे. 2015 च्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे.

भारतामध्ये 2015-16 च्या सर्वेक्षणात 21 टक्के स्त्रिया लठ्ठ होत्या, तर यंदाच्या सर्वेक्षणात 24 टक्के महिला लठ्ठ असल्याचं समोरं आलं आहे.

पुरुषांमध्ये हा आकडा 19 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक चांगली बाब म्हणजे भारतातील महिलांची सामाजिक स्थिती सुधारलेली दिसतेय. शहरातील 81 टक्के महिला आणि ग्रामीण

भागातील 77 टक्के महिला घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपलं मत व्यक्त करतायत. 79 टक्के महिलांकडे बचत बँक खातं आहे, तर 4 वर्षांपूर्वी 53 टक्के महिलांचं स्वत:चं बँक खाते होते.

आता भारतातील 78% लोकांना हात धुण्याची सवय लागली असून 4 वर्षांपूर्वी ही संख्या 60 टक्क्यांवर होती.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!