Monday, May 23, 2022

ही बँक उद्या रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सुट्या नसल्या तरी काही ना काही कारणे काढून जोडून सुट्या घेणाऱ्या सरकारी बँकांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआय आणि पीएनबी

बँका उद्या रविवार असूनही आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार आहेत. एरव्ही जेवणाची सुटी झाली म्हणून ग्राहकांना माघारी पाठवून देणाऱ्या एसबीआयने

एलआयसी आयपीओसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसी आयपीओ ४ मेपासून खुला झाला आहे आणि ९ मे रोजी बंद होणार आहे. म्हणजेच शनिवार आणि रविवारी गुंतवणूकदार

बोली लावू शकणार आहेत. यामुळे स्टेट बँकेने आपल्या शाखा रविवारीही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने ट्विट करून याची माहिती दिली आहे. एसबीआयने म्हटले की, ‘आम्हाला

कळविण्यात आनंद होत आहे की LIC IPO साठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी, SBI च्या सर्व शाखा 8 मे 2022 रोजी म्हणजेच रविवारी देखील अर्ज स्वीकारण्यासाठी खुल्या राहतील.

१७ मे रोजी एलआयसीचा शेअर लिस्टिंग होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्यास सांगितले आहे.

एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा! एसबीआयने सांगितले की, योनोवर तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा, यासाठी तुम्हाला कोणताही ओपनिंग चार्ज

लागणार नाही तसेच डीपी एमसी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षासाठी विशेष सूट दिली जाईल. यापूर्वी एसबीआयने एसबीआय सिक्युरिटीज डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे एलआयसी आयपीओ

गुंतवणुकीसाठी समान अधिसूचना जारी केली होती. तथापि, गुंतवणूक सुरू करण्यासाठी, ग्राहकांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!