Wednesday, May 25, 2022

ना. थोराताकडून नाव न घेता विखेंचा जोरदार समाचार म्हणाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संगमनेर तालुक्यातील खळी येथील शेतकरी मेळाव्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे होते. तर व्यासपीठावर महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

सत्तेसाठी काहींनी उड्या मारल्या, पण ते खडकावर आपटले. आता त्यांना नैराश्य आले आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे, हे त्यांना देखवत नाही. नैराश्यातूनच

ते सरकारवर टीका करत असल्याचा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता आमदार राधाकृष्ण विखे यांना लगावला आहे.

ना. थोरात म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करून तालुक्यात समृद्धी निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अकोले, संगमनेरच्या हक्काच्या पाण्यासाठी पूर्वेच्या लोकांनी

कायमच विरोध केला. हक्काच्या पाण्यासाठी चळवळ उभी राहिली आणि हक्काचे पाणी मिळवलं. आपला विकासकामांचा रथ सुरुच राहणार आहे. आपण कधी कुणाचं नुकसान केलं

नाही, कुणी विरोधी वागला तरी आपण त्याचं वाईट केलं नाही. मात्र काहींनी सत्तेसाठी उड्या मारल्या, पण ते खडकावर आपटले. राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत

असतांना चांगल्यावर टीका करणे हा त्यांचा स्वभावच आहे. त्यांचे दुध संघ बंद पडले आणि ते दुसर्‍यांची चौकशी करण्याचे उद्योग करत आहेत, असा चिमटा त्यांनी विखे यांचे नाव न घेता काढला.

प्रामाणिक काम जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे आपल्याला कायम यश मिळत आहे. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. विचारांवर निष्ठा ठेवली. अडचणीच्या काळात पक्षाची

धुरा सांभाळली. यामुळे पक्षात आणि राज्यात कायम सन्मान मिळतो आहे. हा सन्मान संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे असे थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!