Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग :मी किती दिवसांपासून तुझ्यामागे फिरतोय पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही असे म्हणत विवाहितेवर उसात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मी किती दिवसांपासून तुझ्यामागे फिरतोय. पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही. असे म्हणत 30 वर्षीय विवाहित महिलेला

उसात ओढून नेले. नंतर विळ्याने तिचा गळा कापण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील

खुडसरगाव शिवारात दि. 6 मे रोजी घडली आहे.या घटनेतील 30 वर्षीय महिला ही राहुरी तालुक्यातील वांजुळपोई परिसरातील असून सध्या ती तिच्या कुटुंबासह माहेगाव परिसरात

रहावयास आहे. दि. 6 मे रोजी ती महिला व इतर दोन महिला खुडसरगाव शिवारातील शेतात गवत खुरपत होत्या. त्यावेळी पीडित महिला शेताच्या एका बाजूला तर इतर दोन महिला शेताच्या दुसर्‍या बाजूला

गवत खुरपत होत्या. दुपारी दोन वाजे दरम्यान आरोपी नवनाथ जाधव हा तेथे आला.पीडित महिलेला म्हणाला, मी किती दिवसांपासून तुझ्यामागे फिरतोय. पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही.

असे म्हणून त्याने त्या महिलेला उसात ओढून नेले. तेव्हा त्या महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिच्या हातातील विळा घेऊन तिच्या गळ्यावर लावला. नंतर त्याने गळा कापण्याची

धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केला. त्यावेळी पीडित महिलेचा पती त्या ठिकाणी येत असल्याचे पाहून आरोपी नवनाथ जाधव हा घटनास्थळावरून पसार झाला.

पीडित महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी नवनाथ भाऊसाहेब जाधव रा. वांजुळपोई ता. राहुरी याच्या विरोधात शारिरीक

अत्याचार व मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...
error: Content is protected !!