माय महाराष्ट्र न्यूज:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असलेल्या तीन नेत्यांपैकी एक नेता थेट हैदराबादला पोहोचला आहे. हा नेता चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरा नेता राष्ट्रवादीचा बडा पदाधिकारी असून त्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे.
हा नेता आधी रयत शिक्षण संस्थेवर होता. मात्र त्या पदावरून काढण्यात आल्याने हा नेता नाराज असल्याचे बोलले जात आहे.तिसरा नेता हा पाथर्डी तालुक्यातील असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानेच हा
नेताही बीआरएसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आगामी राजकीय पर्यायाची तयारी करण्यासाठी पाथर्डीमधील राष्ट्रवादीचा हा नेता भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.श्रीगोंदा तालुक्यातील महत्वाचे नेते मानले जाणारा तो नेता सध्या
हैद्राबादमध्ये गेले असून तेथे ते बीआरएसचे नेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. तर कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील आणखी दोघेही बीआरएसच्या संपर्कात आहेत. ते दोघेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात सभा झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. नेमकी विधानसभेची तयारी सुरू असताना बीआरएसने
महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुढील सोय लक्षात घेता विविध पक्षांतील नेत्यांकडून प्रतिसाद मिळेल, अशी अटकळ राव यांची असावी. ती खरी ठरताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात याची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून होत असल्याचे दिसते.
श्रीगोंदा तालुक्यातील त्या राजकीय नेत्याची सुरुवात भाजपपासून झाली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, पुन्हा पाक्षपासून दुरावले. नंतर पुन्हा पक्षात आल्यावर विधानसभेची उमेदवारीही मिळाली. आता पुढील विधानसभेला
ते इच्छुक असल्याचे मानले जात असतानाच श्रीगोंदा मतदारसंघातून पक्षाने माजी आमदार राहुल जगताप यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. जगताप यांनीही अलीकडे झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांत आपला करिष्मा पुन्हा दाखवून दिला आहे. त्यामुळे
आता पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेलार अस्वस्थ आहेत. त्यातूनच त्यांनी नवीन पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र, ते निवडक कार्यकर्त्यांसह हैद्राबादला गेल्याचे सांगण्यात आले.
कर्जत तालुक्यातील बडा नेताही सध्या नाराज आहे. जिल्ह्याचे पद असूनही स्थानिक पातळीवर डावलले जात आहे. पक्षात थेट पवार यांच्याशी संपर्क असलेल्या या नेत्याची स्थानिक पातळीवर कोंडी झाली आहे. विश्वासात घेतले जात नसले तरी परभवाचे खापर मात्र फोडण्यात येत आहे.
यातूनच हा नेताही नाराज असून त्यांच्याकडूनही बीआरएसची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.