नेवासा
तालुक्यातील निपाणी निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सिंधुताई आदमने तर उपाध्यक्षपदी कावेरी काकडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. या सोसायटीवर मंत्री शंकरराव गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या सोसायटीची
जेष्ठ कार्यकर्ते पाराजी आदमने, पोपट काकडे,रामनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाला निर्विवाद बहूमत मिळालेले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी निपाणी निमगाव सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाची बैठक झाली.अध्यक्षपदासाठी सिंधुबाई गोरक्षनाथ आदमने यांचे नाव पोपट काकडे यांनी सुचविले त्यास कडू काकडे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी कावेरी भाऊसाहेब काकडे यांच्या नावाची सुचना रामनाथ गायकवाड यांनी केली त्यास राजेंद्र पवार यांनी अनुमोदन दिले. सदर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. जहागिरदार यांनी जाहिर केले .
नुतन पदाधिकाऱ्यांचे मंत्री शंकरराव गडाख, पशुसंवर्धन व अर्थ सभापती सुनिल गडाख, सुनिताताई गडाख, उदयन गडाख यांनी आभिनंदन केले.
नेवासा स्टाफ सोसायटीचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव संदीप आदमने यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.