Tuesday, May 17, 2022

रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उन्हाळ्यात सकाळी कडक सूर्यप्रकाश आणि रात्री डासांचा हल्ला. हा ऋतू असा आहे की ज्यावेळी प्रत्येकाला माश्या आणि डासांचा त्रास होतो. तुम्ही खोलीच्या बाहेरही

बसू शकत नाही, कारण खोलीच्या बाहेर डासांचा हल्ला दुपटीने वाढतो.माश्या आपल्याला त्रास देतात तसंच डास चावल्यामुळे त्वचेवर लालसरपणा,

पुरळ उठू लागते आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते.अशा स्थितीत तुम्ही तुमच्या घरात अशी काही रोपे आणू शकता, ज्यामुळे तुमची समस्या कमी होऊ शकते. पण प्रश्न असा

आहे की हे फुलं आणि वनस्पतींनी डासांना दूर ठेवणं शक्य आहे का? होय, तुमच्या आजूबाजूला अशी झाडे ठेवून तुम्ही या बग्सना नक्कीच दूर ठेवू शकता.सिट्रोनेला हे एक तण आहे जे तुम्ही

तुमच्या अंगणात लावू शकता. बहुतेक सिट्रोनेला उत्पादने वनस्पतीपासून काढलेल्या सुगंधी तेलापासून बनविली जातात. काही संशोधनात असेही दिसून आले आहे की या तेलाचे

दोन तासांत बाष्पीभवन होते, म्हणून त्याचं रोप लावणे हा एक चांगला पर्याय आहे.निलगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता.

अन्यथा, त्याची पाने गोळा करा आणि डास आणि माश्या दूर करण्यासाठी वापरा.चहामध्ये लेमन ग्रास पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असतीलच! पण तुम्हाला माहीत

आहे का की याच्या मदतीने तुम्ही डासांनाही दूर करू शकता. आणखी एक अद्भुत डास निरोधक म्हणजे लेमनग्रास, ज्याला सायम्बोपोगन सायट्रेटस असेही म्हणतात.

फुलामध्ये सिट्रोनेला नावाचा घटक असतो, हे एक नैसर्गिक तेल आहे जे माश्या, डास यांसारख्या इतर कीटकांना दूर करते.तमालपत्र किटकांपासून मुक्त

होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ते तुमच्या घराभोवती, बागेत, अंगणात किंवा बाहेर लावू शकता. जर तुम्ही आजूबाजूला एखादे रोप लावू शकत नसाल, तर तुम्ही तमालपत्र

जाळून भांड्यात शकता आणि नंतर त्याचा धूर खोलीत पसरवा. यामुळे डासही पळून जातील आणि तुमचा मूडही फ्रेश होईल.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!