माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणार्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी किन्ही एकोडी (ता. साकोली जि. भंडारा) येथून
ताब्यात घेत अटक केली. या ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा दोन दिवस शोध घेऊन मुसक्या आवळल्या. दिग्रेश दामू बडोले (रा. किन्ही एकोडी) असे
अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या युवतीला दिग्रेश बडोले याने लग्नाचे आमिष दाखविले होते.
परंतू त्याने तिच्यासोबत लग्न न करता तिची फसवणूक केली. तिच्यासोबत वेळोवेळी संबंध ठेवत शारिरीक अत्याचार केला. पीडित युवतीने 2 मे, 2022 रोजी नगर तालुका पोलिसांत दिलेल्या
फिर्यादीवरून आरोपीविरोधात अत्याचारा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना मार्च, 2018, नोव्हेंबर 2019 मध्ये नगर तालुक्यातील एका गावात घडली.तसेच 3 एप्रिल, 2022 रोजी
नागापूर जिल्ह्यात घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण), सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग, पोलीस अंमलदार विशाल टकले, संदीप जाधव यांच्या पथकाने आरोपी दिग्रेश बडोले याचा मुळ गावी दोन दिवस शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.