Wednesday, May 25, 2022

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्ज हवंय? पाहिजे तितकं घ्या सरकारची महत्त्वाची योजना

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकर्‍यांच्या नाशवंत कृषी मालाच्या काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा,सामुदायिक शेती मालमत्ता प्रोत्साहनासाठी व आर्थिक सहाय्य

देण्याकरिता केंद्र सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागामार्फत २०२०-२१ ते २०२९-३० या कालावधीसाठी कृषी पायाभूत सुविधा योजना (अ‍ॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम)

राबविण्यात येत असल्याची माहिती किसन मुळे, संचालक (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी आयुक्तालय, पुणे) यांनी दिली.केंद्र शासनामार्फत या योजनेंतर्गत

कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याकरिता १ लाख कोटी रुपये इतक्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. २०२०-२१ ते २०२९-३० या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्याकरिता

८ हजार ४६० कोटी रुपये कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. त्यावर २ कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जांवर वार्षिक ३ टक्के व्याज सवलत आहे.

शेती हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण देश व राज्य पातळीवर अनुक्रमे ६९ व ५५ टक्के आहे. राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांचे प्रमाण

८१ टक्के आहे. सुमारे ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्र असल्याने जागतिक हवामान बदलाचा तसेच बाजारातील शेतमालाच्या विक्री मूल्यातील चढ-उताराचा परिणाम थेट शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नावर होतो असे मुळे यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रिया उद्योगांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत पीक कापणीनंतरचे व्यवस्थापन उदा. ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदाम, पॅक हाऊस, मुरघास, संकलन केंद्र,

 

वर्गवारी आणि प्रतवारीगृह, शीतगृह, पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर आणि सामूहिक शेतीकरिता आवश्यक इतर किफायतशीर प्रकल्पांचा (सेंद्रिय उत्पादने, जैविक

निविष्टा उत्पादन प्रकल्प, अचूक शेती व्यवस्थापन) समावेश आहे.सदर योजनेतंर्गत प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वंयसहाय्यता गट, शेतकरी, संयुक्त

उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योेजक, स्टार्टअप आणि केंद्र-राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना लाभ घेता येईल.

 

या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत २ कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जांवरील व्याजाला वार्षिक ३ टक्के सूट असेल.सदर सवलत ही जास्तीत- जास्त ७ वर्षांपर्यंत उपलब्ध आहे. पात्र कर्जधारकांसाठी

सूक्ष्म व लघू उद्योजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्टअंतर्गत २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी या वित्तपुरवठा सुविधेतून पत हमी संरक्षण उपलब्ध असेल.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!