Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग:शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावांत असलेल्या घाणेवस्ती येथे शेततळ्यामध्ये बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.०८) सकाळी

घडली. या दुर्घटनेमुळे मोधळवाडी गावासह पठारभाग परिसरात शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षे २१) व आयुष बबन शिंदे वय (७) असे

शेततळ्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावाचे नाव आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या

मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी त्यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या

शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली

मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.बहीण भाऊ शेततळ्यामध्ये बुडाल्याची माहिती समजताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी

धाव घेतली.नागरिकांनी दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढले. मात्र त्यापूर्वीच दाेघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव येथील दोघा

सख्‍ख्‍या बहिण-भावाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य पाहताच गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या दुर्घटनेमुळे पिंपळगाव देपा गावासह पठार भागावर शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!