Monday, May 23, 2022

युट्युबवर दर महिन्याला करा 2 लाखांची कमाई

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशात युट्युब असतं. युट्युब हे आज एक असे व्यासपीठ बनले आहे जिथून कमाईचे

अनेक मार्ग आहेत. बर्‍याच लोकांसोबत असे घडते की त्यांचे YouTube चॅनल देखील चांगली कामगिरी करतेआहे, परंतु कोणतीही कमाई होत नाही.

वास्तविक यामागे युट्युबचे धोरण आहे. तुम्हाला फक्त या पॉलिसी अंतर्गत काम करावे लागेल, नाहीतर तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यत पोचू शकणार नाही, तुम्ही त्यातून कमाई करणे तर दूरच राहिले.

प्रथम काही मूलभूत गोष्टींबद्दल जाणून घेऊया. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्युब पार्टनर प्रोग्राम (YPP) साठी अर्ज करावा लागेल. या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी तुमच्या चॅनेलचे

1,000 सदस्य असणे आवश्यक आहे. गेल्या 12 महिन्यांत 4,000 योग्य पब्लिक वॉच असली पाहिजेत म्हणजे इतक्या लोकांनी किंवा इतक्या वेळा तुमचा व्हिडिओ पाहण्यात आला असला पाहिजे.

तुम्ही Youtube स्टुडिओला भेट देऊन या भागीदारी कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी पात्र आहात की नाही हे देखील तपासू शकता.एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर, Youtube टीम एका महिन्याच्या आत

तुमच्या चॅनेलचे पुनरावलोकन करते. आपल्या चॅनलवर सतत अपलोड होणारे व्हिडिओ पाहिले जातात. आता सुरुवातीलाच एक सर्वात महत्वाची गोष्ट, इथे जर तुमची चूक झाली असेल तर महिन्याभरात भरपूर पैसे

कमवण्याचे स्वप्न थोडे पुढे ढकलले जाऊ शकते. तुमच्या चॅनेलवर समान कॉन्टेन्टची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणजेच तुम्ही आधी अपलोड केलेला व्हिडिओ असू नये. आधी अपलोड केलेला

व्हिडिओच व्ह्यूज वाढवण्यासाठी पुन्हा अपलोड केला. अशा परिस्थितीत तुम्हाला सध्या YPP चे सदस्यत्व दिले जाणार नाही.Youtube आणि तुमचा कमाईचा एकमेव मार्ग म्हणजे जाहिराती.

एकदा तुम्ही YPP चे सदस्य झाल्यावर, तुम्हाला चॅनलवरील जाहिराती देखील चालू कराव्या लागतील. ते चालू केल्यानंतर, तुमच्या व्हिडिओवर मिळालेल्या जाहिरातीचे पैसे तुम्हाला थेट दिले जातील.

परंतु यामध्येही प्रत्येक व्ह्यूनुसार पैसे दिले जातात. म्हणजेच, तुमचा व्हिडिओ जितका जास्त पाहिला जाईल, तितके तुम्हाला पैसे दिले जातील. औषधे, लैंगिक विषय यासंदर्भातील कॉन्टेन्ट असताना

जाहिराती दिल्या जाणार नाहीत. या गोष्टींची काळजी घेतल्यास Youtube वरून भरपूर कमाई होऊ शकते.सोशल मीडिया किंवा युट्युबसारख्या व्यासपीठांचा वापर हल्ली अनेक पद्धतीने केला जातो.

सुरूवातीला फक्त मनोरंजन किंवा लोकांशी जोडून घेण्यासाठी असलेली ही व्यासपीठे आता कमाईचे साधन झाले आहेत. लाखो लोक यातून दणदणीत कमाई करत आहेत.

तुम्हालाही यात रस असल्यास आणि सातत्याने काम करायची तयारी असल्यास तुम्हीदेखील मोठी कमाई करू शकता.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!